6 अपर पोलीस महासंचालक 5 विशेष पोलीस महानिरीक्षक आणि 6 राज्यसेवेतील पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या

 

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.तसेच राज्यसेवेतील 6 अधिकार्‍यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. ह्या आदेशांवर गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांचे डिजिटल स्वाक्षरी आहे.

भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालकपदाचे सुनील रामानंद यांना नियोजन व समन्वय महाराष्ट्र राज्य मुंबई या रिक्त पदावर पाठविण्यात आले आहे. अपर पोलीस महासंचालक विशेष कृती विभागातील प्रवीण साळुंखे यांना अपर पोलीस महासंचालक लोहमार्ग या पदावर नियुक्ती दिली आहे. नियंत्रक वैध मापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई येथील सुरेश मेखला यांना अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर पाठविले आहे. अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग येथील दीपक पांडे यांना अपर पोलीस महासंचालक पोलीस दळणवळण, माहिती, तंत्रज्ञान व परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाठवले आहे.अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधार सेवा पूणे येथील अमिताभ गुप्ता यांना अपर पोलीस महासंचालक विशेष कृती या पदावर पाठविण्यात आले आहे.

पोलीस महानिरीक्षक श्रेणी या पदातील विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था सुहास वारके यांना विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे.पोलीस सह आयुक्त नागपूर शहर येथील अश्वती दोरजे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र येथील छेरिंग दोरजे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील रंजन कुमार शर्मा यांना सह आयुक्त पुणे शहर या पदावर पाठविले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य गुन्हे अभिलेख विभाग पुणे येथील डी. के. पाटील भुजबळ यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र येथे पाठवण्यात आले आहे.

राज्यसेवेतील पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अनिल बाबुराव शेवाळे यांना गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथील अपर पोलीस अधीक्षक या पदावरून पोलीस उप अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक पुणे येथे पाठवले आहे. धन्यकुमार चांगदेव गोडसे हे आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे पोलीस उप अधीक्षक आहेत.त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे पाठवले आहे. दादाहरी केशव चौरे हे बृहन्मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर जिल्हा जालना येथे पाठवले आहे. विजय तुकाराम पाटील हे आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उप अधीक्षक आहेत,त्यांना पाटण येथे पोलीस उप अधीक्षक या पदावर पाठवले आहे.मनोहर नरसप्पा पाटील हे यवतमाळ जिल्ह्यात मुख्यालयात पोलीस उप अधीक्षक आहेत,त्यांना अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती पालघर येथे पोलीस उप अधीक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथील अपर पोलीस अधीक्षक सुधाकर चंद्रभान सुराडकर यांना सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्यात उदगीर येथील पोलीस उप अधीक्षक सोहेल नूर मोहम्मद शेख आणि पाटण येथील पोलीस उप अधीक्षक सविता मारुती गर्जे यांच्या बदल्या केल्या आहेत.परंतु त्यांना नविन नियुक्ती अद्याप देण्यात आलेले नाही. त्यांच्यासाठी वेगळे आदेश निर्गमित होतील असे लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *