नांदेड(प्रतिनिधी)-नुकताच राज्याचा अर्थ संकल्प सादर झाला. आता केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या विकासाबरोबरच नांदेडच्या विकासाचे ही प्रश्न मार्गी लागावे. मी नुकतीच रेल्वे मंत्री अश्र्विनकुमार वैष्णव यांची भेट घेवून नांदेड-बिदर आणि नांदेड-लातूर या रेल्वे मार्गाच्या संदर्भाने येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी विनंती केली असल्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलत असतांना सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, शिवेसना जिल्हाध्यक्ष आनंदराव बोंढारकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांची उपस्थिती होती. यावेळी खा.चव्हाण यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणे गप्पा मारतांना अनेक प्रश्नांवर त्यांनी सडेतोड उत्तरे देत. पत्रकारांचीही अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.
नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मी नेहमीच कटीबध्द आहे. नांदेडकर माझ्या पाठीमागे नसले तरी मी मात्र नांदेडकरांच्या पाठीमागे आहे. मी कुठेही असलो तरी नांदेडच्या विकासासाठी कायम नांदेडकरांसोबत आहे. विशेषत: नांदेड जिल्ह्यातील रेल्वे स्थानके हे दोन विभागात विभागले गेले आहेत. शिवनगाव, उमरी, धर्माबाद ही रेल्वे स्थानके हैद्राबाद विभागात आहेत. किमान एका जिल्ह्यातील रेल्वे स्थानके एकाच विभागात असावेत. याचबरोबर बुलेट ट्रेनचीही अवश्यकता सध्याच्या काळात आहेच. नांदेड शहरातील जनता मार्केट हे पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. पण या भागातील नागरीकांच पुर्नवसन झाल पाहिजे आणि तेही त्याच जागेवर ही पण माझी इच्छा आहे. याबाबत आयुक्तांशी आणि गुत्तेदारांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जरांगे यांच्यासोबतची दुसरी बैठक आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांची मी शुक्रवारी भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शासन आरक्षणाच्या बाबतीत लक्ष देवून आहे. हैद्राबाद गॅजेट मिळवल्यानंतर त्यावर किती जणांना ओबीसीचा लाभ मिळू शकतो यावरही अभ्यास करणे गरजेचे आहे. याचबरोबर शासन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण काही गंभीर स्वरुपाची गुन्हे न्यायालयाच्या निर्णयानंतरच यावर विचार करता येऊ शकतो. याचबरोबर ओबीसी आणि मराठा यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे की, पण राज्यात शांतता राहावी असेही मी त्यांना सांगितले. मी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि शासनाची समन्वय करण्याच काम करत आहे.