नांदेड येथील संपादक कृष्णा शेवडीकर यांनी शासनाला लावला चुना-विनोद पत्रे

नांदेड,(प्रतिनिधी)-माहिती महासंचालनालयाची दिशाभुल करून बृहन्महाराष्ट्र वृत्तपत्र संपादक संघ नोंदणीकृत नसतांना त्या संघटनेचा नंबर पुण्याच्या संघटनेला देवून शासनाला मामा बनविण्याचा प्रकार नांदेडच्या कृष्णा चंडीदासराव शेवडीकर यांनी केला आहे. आजपर्यंत 65 हजार 818 रुपयांचा भत्ता जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथून उचलला असल्याची माहिती पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिल्यानंतर हॅलो चांदान्युज यांनी ही माहिती प्रसिध्द केली आहे. हॅलो चांदान्युजला धन्यवाद देवून आम्ही ही माहिती पुन्हा प्रसारीत करीत आहोत. हॅलो चांदा न्युजचे संपादक शशी ठक्कर आणि उपसंपादक विनोद शर्मा रा.वरारा जि.चंद्रपुर हे आहेत.

बृहन्महाराष्ट्र वृत्तपत्र संपादक संघ नोंदणीकृत नसल्याचे सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय पुणे यांनी माहितीच्या अधिकारात 26 ऑक्टोबर 2023 रोजी दिले आहे. या संघटनेचा क्रमांक टी.ए.क/23 आर/ विपश/1978 हा महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुणे-30 यांचा असल्याचे त्या लेखी पत्रात नमुद केले आहे. बृहन्महाराष्ट्र वृत्तपत्र संपादक संघाच्या नावावर हा बनावट नंबर वापरून त्याचे बनावट कागदपत्र तयार करून वार्षिक अहवाल, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांना नांदेड येथील अत्यंत व्हाईट कॉलर पत्रकार कृष्णा चंडीदासराव शेवडीकर यांनी सादर केले. सोबतच राज्य अधिस्विकृती समिती व डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीती सदस्यत्व मिळवले. या दोन संघटनांच्या बैठकांसाठी गेल्यानंतर दि.1 डिसेंबर 2008 ते 19 जुलै 2018 यामध्ये 65 हजार 818 रुपये भत्ता उचलल्याचे पत्र जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांनी 4 मार्च 2024 रोजी दिले आहे.

अधिस्विकृती समिती सदस्य कृष्णा चंडीदासराव शेवडीकर यांनी बनावट, बोगस कागदपत्र देवून 2008 पासून ते आजपर्यंत शासकीय भत्ता उचलून आर्थिक बसवणूक करीत आहेत. हे सर्व मुंबई येथील महासंचालक कार्यालयाला माहित आहे. या संदर्भाच्या अनेक तक्रार लेखी स्वरुपात पुराव्यांसह दाखल होवू न ही काही अधिकारी जाणिवपुर्वक, हेतुपुरस्सर पाठीशी घालत असल्याचे जाणवते. नांदेड येथील ज्येष्ठ महिला पत्रकार यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचे लेखी पत्र व ईमेलद्वारे कळविले असता विनोद पत्रे यांच्या पत्रकार संरक्षण समितीने त्यांना पाठींबा दिला असतांना तरीपण माहिती खात्याच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या महिलेला पत्र देवून आमरण उपोषण रद्द करण्यास भाग पाडले.

या सर्व परिस्थितीवरून अधिकाराचा वाटा(खरी कमाई) तर नाही की, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू पत्रकार आणि संपादकांमध्ये ऐकावयास मिळते आहे. ही माहिती देतांना विनोद पत्रे यांनी सांगितले आहे की, आम्ही इथेच थांबणार नाही. जीवनाच्या वाटेवर भ्रष्टाचार करणाऱ्या पत्रकारांना, संपादकांना, पत्रकार संघटनेला आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी मुंबई व राज्यातील अनेक माहिती अधिकारी यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही.खरे पत्रकार बाजूला राहिले आणि पत्रावळी हातात घेतलेले आता चांदीच्या ताटात जेवत आहेत ही पत्रकार या शब्दाची दुर्गती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *