नांदेड(प्रतिनिधी)-महेबुबनगर नांदेड भागातील एक कुटूंब घराला कुलूप लावून हणेगाव येथे गेले असतांना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ते घर फोडून त्यातून 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शोएब नफीयोद्दीन मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जुलैच्या दुपारी 4.30 वाजता ते आपले घर बंद करून कुटूंबासह हाणेगाव येेथे गेले होते. 3 जुलै रोजी परत आले तेंव्हा त्यांचे घराचे मुख्य गेटचे कुलूप तोडलेले होते.घरात पाहणी केली असता रोख रक्कम 57 हजार रुपये, सोन्याचे फुल साडे तीन ग्रॅम वजनाचे 10 हजार रुपये किंमतीचे, चांदीचे वाळे तीन तोळे वजनाचे 1 हजार रुपये किंमतीचे, सोन्याच्या चार अंगठ्या 12 हजार रुपये किंमतीचे, चांदीचे पैंजन 25 तोळे वजनाचे 5 हजार रुपये, एक लॅपटॉप संगणक 10 हजार रुपयांचा असा एकूण 95 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही चोरीची घटना भारतीय दंड संहितेच्या कलम 331(3)(4), 306(अ) नुसार गुन्हा क्रमांक 215/2024 नुसार दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव हे करणार आहेत.