कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनास जमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड,(जिमाका)- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन लोकांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे शासनास जमीन विक्री करणाऱ्या इच्छुक शेती विक्रेत्यांनी संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडुन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेजवळ, नांदेड या कार्यालयाशी संपर्क करावा.

अर्जासोबत विहित नमुना अर्ज फोटोसह, भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे ), आधार कार्ड (पुरावा वय 18 ते 60 वर्ष ), जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती व नवबौद्ध), उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), प्राधान्य(परित्यक्ता/विधवा/अनु.जाती अत्याचार पीडित) इत्यादी कागदपत्रे जोडन कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!