पालकांनो आपली मुलगी शहाणी झाली आहे हो !

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या उत्तर भागात ऍटोमध्ये घडलेल्या प्रकाराची व्हिडीओ रेकॉर्डींग झाली आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील आरोपी युवक सध्या पोलीस कोठडीत आहे. पण आजही ती परिस्थिती बदलली नाही. शहराच्या दक्षीण भागात नदीपलिकडे असलेल्या निर्जन ठिकाणी एका कारमध्ये ऍटो सारखाच प्रकार सुरू होता. त्याने दक्षता घेत एक युवक बाहेर राखण करण्यासाठी कारजवळ उभा होता. परवाच्याा प्रकार पोलीसांनी दखल घेवून कार्यवाही केली. पण हे प्रकार त्या कार्यवाहीमुळे थांबले नाहीत असेच आजचे चित्र सांगते. यावर पोलीसांनी नव्हे तर समाजाने स्वत:च विचार करून आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण देण्याची गरज आहे.
दोन दिवसांपुर्वी शहरातील एका शाळेजवळ निर्जन भागात उभ्या असलेल्या ऍटोची एकाने व्हिडीओ रेकॉर्डींग केली. त्यामध्ये एक युवक अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल प्रकार करतांना सापडला. या प्रकाराबद्दल अनेक संघटनांनी आवाज उठविला. व्हिडीओ व्हायरल होवू लागला तेंव्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्हिडीओमधील मुलगी अल्पवयीन आहे. तो व्हिडीओ व्हायरल करू नका अशा सुचना समाजमाध्यमांवर प्रसारीत केल्या आणि पोलीसाच्यावतीनेच या घटनेची तक्रार देण्यात आली आणि तो युवक गजाआड करण्यात आला. सध्याा न्यायालयाने त्याला 6जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पुढे तो न्यायालयीन कोठडीत जाईल आणि त्यानंतर जामीन मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. या गुन्ह्यातील सर्वच बाबी आज लिहिता येणार नाहीत. परंतू या गुन्ह्यातून खुप काही समाजाला शिकण्यासारखा धड्डा मिळेल असे लिहिण्यास बिलकुल वाव नाही. जगात सर्वकाही आपल्या मनासारखे घडत नसते. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या वळणांनी जाऊन आपले ध्येय गाठायचे असते असेच काही तरी याा गुन्ह्यातील प्रकरणात पुढे समोर येईल.
ऍटोवाला युवक सध्या पोलीस कोठडीत असतांना सुध्दा हे प्रकार बदं झाले नाहीत. आज दुपारी 4 वाजेच्यासुमारास शहरातील दक्षीण भागात सन्मान ऑक्सीझोन अर्थात नागार्जुना पब्लिक स्कुलच्या पाठीमागील भागात खुप मोठी लोकवस्ती नाही. या रस्त्यांची अवस्था सध्या तरी अत्यंत सुंदर आहे. हे रस्ते ज्यावेळी चांगल्या स्वरुपात नव्हते. त्यावेळी सुध्दा या भागात असंख्य घटना घडल्या आहेत. त्यााचाा उल्लेख आज करण्यापेक्षा आज काय घडले याला जास्त महत्व देवू या. या ठिकाणी उभी असलेली एक कार ज्यावर क्रमांक नांदेड जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्रात शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या जिल्ह्याचा क्रमांक होता. या गाडीच्या ड्रायव्हींग सिटजवळ एक युवक पहारा देत होता आणि दुसरा युवक त्या गाडीमध्ये तेच करत होता जो ऍटोवाला मुलगा करत होता. या संदर्भाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा व्हिडीओ करणाऱ्याने तो व्हायरल केलेला नाही. पण तो वास्तव न्युज लाईव्हपर्यंत पोहचविला. वास्तव न्युज लाईव्हाला हा व्हिडीओ देण्यामागे देणाऱ्याची इच्छा सुध्दा समाजात चालणाऱ्या या गोष्टींवर कुठे तरी जरब बसावा अशीच आहे. पण कोण काय करणार? त्या मुलीला कोण विचारणार, त्या युवकाला कोण विचारणार आणि त्याने तर एक सुरक्षा रक्षक सुध्दा सोबत आणला होता. मग विचारणाऱ्यांचे हाल त्यांनी काय केले असतील हाही प्रश्न मोठा आहे.
या प्रकारांना थांबवायचे असेल तर पालकांनी आपल्या युवक आणि युवतींना विशेष करून शहाण्या झालेल्या मुलींना आपल्याच घरात समजून सांगण्याची गरज आहे. कारण कोणतेही चांगले काम करायचे असेल तर त्याची सुरूवात आपल्या घरापासूनच करावी असे याा निमित्ताने सांगायचे आहे. आमच्या या प्रयत्नांना समाजातील काही कुटूंबांनी जरी प्रतिसााद दिला तर आमच्या लेखणीची किंमत राहिल नसता समाजाच्या वृत्ती पुढे आमच्या लेखणीचा रंग पुसट होवू जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *