निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले वृक्षारोपण

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे केले आवाहन

नांदेड- लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी नांदेड येथे काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लावून वृक्षारोपण केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. शिंदे, उपप्राचार्य अरुणा शुक्ला, इ.एम खिल्लारे, वनविभागाचे बेदरकर, महाविद्यालयाचे संशाधन अधिकारी विशाल मराठे, प्रा. अश्विनी बोरीकर, प्रा. रंजन राठोड, प्रा. विनायक चव्हाण आदीची उपस्थिती होती.

 

यावर्षीच्या मे महिन्यात उन्हामुळे खूप गरम वातावरणात होते. त्यावेळी सर्वजण वृक्षारोपण करण्याबाबत बोलत होते. परंतु आता पाऊस पडल्यानंतर सर्वजण या गोष्टीला विसरुन गेले आहेत. आता वृक्ष लावण्यासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी खूप चांगले वातावरण असून आपण सर्वानी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्रयत्न केले पाहिजे. पावसाळयाच्या काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण केल्याने आजूबाजूचा परिसर हिरवागार होईल असे मत निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी व्यक्त केले.

निवडणूक खर्च अधिकारी डॉ. दिनेश कुमार जांगिड हे निवडणूक कामासाठी आतापर्यत जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वृक्षारोपणाचा केले आहे. यापूर्वीही ते उत्तरप्रदेशच्या रायबरेली आणि छत्तीसगढ च्या कोंडागाव येथेही त्यांनी वृक्षारोपणाच केले आहे अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांनी दिली. यावेळी सायन्स महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या एक वृक्ष आईच्या नावाने या अभियानात 10 वृक्षाची लागवड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *