नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी करून राज्यात सहा नवीन प्रवक्ते नियुक्त केले आहेत. नांदेड येथील यापुर्वीचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद यांना नारळ देण्यात आला आहे.
फुले-शाहु-आंबेडकर विचारांचा प्रसार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, सिध्दार्थ मोगले, सोमनाथ साळुंके, तयब जाफर आणि उत्कृर्ष रुपवते या सहा जणांना वंचित बहुन आघाडीच्यावतीने पक्षाचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती दिली आहे. हे पत्र ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी 29 जून 2024 रोजी जारी केले असून त्यात वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकले यांना प्रमुख प्रवक्ता बनविले आहे. त्यांच्यासोबत इतर काम करण्यासाठी इतर पाच जण दिले आहेत. फुले-शाहु-आंबेडकर विचारणसरणी समाजापर्यंत पोहचावी ही जबाबदारी या पक्ष प्रवक्त्यांवर आहे.
फारुख अहेमद यांना नारळ ?
मागील काही वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रवक्ते म्हणून नांदेड येथील फारुख अहेमद हे काम करत होते. परंत नवीन ादीमध्ये ऍड.प्रकाश आंबेडकर यंानी फारुख अहेमद यांना नारळ दिलं असल्याचे दिसते आहे. याची कारणे काय आहेत हे सर्वात जास्त फारुख अहेमद यांनाच माहित असतील.