पोलीसांचा सेवाकाळ खडतरच असतो-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील 29 पोलीस सेवानिवृत्त
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या जीवनातील सेवाकाळ हा खडतर मार्गासारखा असतो. त्या मार्गावर गाडी चालविण्यासारखेच पोलीसांचा सेवाकाळ असतो. आपण कितीही चांगले चालत असलो तरी मार्गावरील अनेक अडचणी आणि त्रास आपल्याला आपोआप मिळत असतात आणि त्या अडचणी आणि त्रासांना सामोरे जावूनच आपण यशस्वीपणे पोलीस सेवा पुर्ण करू शकतो, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून बिनतारी संदेश विभागातील एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक, पाच श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, एक वरिष्ठ श्रेणी लिपीक, आठ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दहा पोलीस अंमलदार असे 29 जण सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्तीनंतर सहकुटूंब समारोप देतांना पोलीस अधिक्षक कोकाटे बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक म्हणून मला दरमहा दु:ख होत असते. त्यात माझा पोलीस अधिक्षक म्हणून स्वार्थ असा आहे की, माझ्या पोलीस दलातील संख्या कमी होत आहे. परंतू सेवानिवृत्ती हा एक समारंभ आहे आणि तो आनंदपुर्वकच साजरा झाला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाला विशेष समजतो. एखाद्या खडतर मार्गावर गाडी चालवतांना ज्याप्रमाणे त्यावर असणाऱ्या अनंत अडचणी जसे खड्डे, वळणे इत्यादी पार करावे लागतात. त्याचप्रमाणे पोलीस सेवाकाळ पुर्ण करत असतांना त्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत. तरीपण त्या आपत्तींना मात करत आपल्याला जीवन पुढे न्यायचे आहे. आपण आपल्या जीवनातील, आपल्या कुटूंबातील, आपल्या नातलगांमधील अनेक सुख दुखांचे प्रसंग सोडून जनतेची सेवा करत असतांना अनेकदा आपल्या चांगल्या कामाची प्रसंसा होत नाही. परंतू आपण चुकलो तर समाज आपल्याला दोषीच समजतो. ज्या प्रेतांना कोणीच हात लावत नाही. त्या प्रेतांचे पंचनामे करतांना आपल्याला त्यांना हाताळावेच लागते आणि हे करत असतांना वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा पोलीस अंमलदार हा या पोलीस दलातील महत्वपुर्ण कणा आहे. कारण वरिष्ठांकडे अनेक संसाधने असतात, त्यांच्याकडे अनेक सुविधा असतात. पण पोलीस निरिक्षक ते पोलीस अंमलदार यांच्याकडे अनेकदा अडचणीसोबतच त्या कामांना पुर्ण करण्याची जबाबदारी असते हे तुम्ही केले आहे. आपल्या जीवनातील अडचणी नवीन पोलीस अंमलदारांना सांगा. त्या अडचणीतून मार्ग कसा काढावा हे त्यांना समजून सांगा. तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर सुध्दा भरपूर काम असेल. समाजात आर्थिक, आरोग्य या संबंधाने जनजागृती करा, पिडीत केंद्र उभारा आणि पिडीतांना न्याय मिळवून द्या. विद्यार्थी ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी जा, वृध्दाश्रमात जा, अनाथआश्रमात जा तेथे सर्व योग्यरितीने चालले आहे की, नाही हे पाहा नसता त्याची माहिती आम्हाला द्या. आपण आपल्या जीवनात चांगले केले तर त्याचा परिणाम आपल्याला चांगलाच मिळतो. म्हणून परिणामाची चिंता न करता चांगले करण्याचा विचार करा.
आज सेवानिवृत्त झालेले पोलीस पुढील प्रमाणे आहेत.पोलीस निरिक्षक कुपीली व्यंकटराव प्रसाद(बिनतारी संदेश विभाग), पोलीस उपनिरिक्षक सुभाष ग्यानोबा वानोळे(सी-47 किनवट), अविनाश गोविंद सातपुते (जिल्हा विशेष शाखा), माणिक देवराव हंबर्डे(गुरुद्वारा सुरक्षा पथक), मोहम्मद मंजुर हुसेन जाफर हुसेन(पोलीस नियंत्रण कक्ष), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक रामलु गंगाराम कर्णे (शहर वाहतुक शाखा), मिर्झा इब्राहिम अहेमद बेग (पोलीस ठाणे भाग्यनगर), बालाजी पुंडलिकराव केंद्रे(मुक्रामाबाद), भास्कर सोपानराव चौदंते (ईस्लापूर), अशोक गोविंदराव केंद्रे(नांदेड ग्रामीण), वरिष्ठ श्रेणी लिपीक दत्ता गणपत अंबलवार (पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजकुमार लक्ष्मणराव कोटगिरे(मोटार परिवहन विभाग), विठ्ठल नागोराव घोडके(गुरुद्वारा सुरक्षा पथक), अशोक जळबाजी दामोधर(लिंबगाव), भारत गबरु राठोड(मांडवी), अशोक माधवराव केंद्रे(लोहा), सुदाम किशनराव ठाकरे(पोलीस मुख्यालय), चंपती परबता कदम(मुखेड), शरिफ हबीब खान पठाण(मुक्रामाबाद), माणिक बापुराव तेलंगे(पोलीस मुख्यालय), विश्र्वांभर शंकरअप्पा स्वामी(धर्माबाद), नामेदव शिवराम खेडकर, राधेजी दत्ता वाघमारे, सुभाष लोभाजी कदम, माधव राघोजी पद्देवाड (पोलीस मुख्यालय), श्रीराम पांडफरंग सवई(उमरी), विठ्ठल दत्तात्रय उतकर(वजिराबाद), गोपाळ मस्नाजी गाजुलवाड (गुरुद्वारा सुरक्षा पथक), गोविंद दत्तात्रय लुंगारे(कंधार) असे आहेत. अनेक सेवानिवृत्तांनी आपल्या पोलीस जीवनातील अनेक प्रसंगांचा उल्लेख करून आपल्या आठवणी ताज्या केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस अंमलदार शेख शमा आणि राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2

oplus_2
oplus_2
oplus_2
oplus_2

oplus_2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *