किनवट तालुक्यात 3 लाखांची चोरी ; नांदेड शहरात 75 हजारांचा ऐवज लुटला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन महिला स्कुटीवर जात असतांना त्यांच्या समोरून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. या बॅगमध्ये 75 हजार रुपयांचा ऐवज होता. तसेच घोटी ता.किनवट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 90 हजार 315 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घोटी ता.किनवट येथील दिपमाला मारोती कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 जूनच्या रात्री 10 ते 30 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांचे बंद घरफोडून च ोरट्यांनी अलमारीचे लॉकर फोडले आणि त्यातून सोन्याचा नेकलेस, सोन्याचे मनी, सोन्याची अंगठी, सोन्याचा गोफ, सोन्याची एकदानी आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 90 हजार 315 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 177/2024 नुसार दाखल केली आहे.या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक चोपडे हे करणार आहेत.
नांदेड येथील देवकी सत्यजित डोईफोडे या दि.30 जून रोजी दुपारी 4.30 वाजेच्यासुमारास आपल्या बहिणीसोबत आपली दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एच.2612 वर बसून सहयोगनगर ते डीमार्टकडे जात असतांना चतुर्थी हॉटेलच्या समोर त्यांच्या विरुध्द दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोन युवकांनी त्यांच्या हातील पर्स बळजबरीने चोरून नेली आहे. त्यामध्ये 75 हजार रुपयांचा ऐवज होता. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 282/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *