नांदेड,(प्रतिनिधी)-उद्या दि.1 जुलै पासून भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023 हे तीन नवीन कायदे अंमलात येणार आहेत. यासाठी उद्या दि.1 जुलै रोजी आयोजित बैठक आणि कार्यक्रमामध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम-2023 हे तीन नवीन कायदे भारतीय संसदेने मंजुर केले आहेत. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर उद्या दि.1 जुलै 2023 पासून हे कायदे अंमलात येणार आहेत. या कायद्यांमुळे आता नवीन-नवीन बदल होतील आणि त्या बदलांना कसे सामोरे जावे यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत जनतेला सुध्दा आमंत्रित केले आहे. उद्या 1 जुलै रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जतनतेने उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.