सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान

 

नांदेड- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीस आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.

 

या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. सुरवातीला आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. या दिंडीत आमदार बालाजी कल्याणकर, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी, विविध शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. सामाजिक न्याय दिनानिमित्त आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

माजिक न्याय भवनात व्याख्यान संपन्न

 

सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृह, सामाजिक न्याय भवन नांदेड येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात “छत्रपती राजर्षी शाहू महाराज वसा आणि वारसा” या विषयावर प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक न्यायाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपल्या पासून केली पाहिजे. आपण ज्या पदावर आहोत त्या पदाला न्याय देता आला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध विचार पैलु व कार्यावर सखोल मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत सामाजिक न्याय, समता बंधुता अधिक सक्षम होण्यासाठी सर्वानी जोमाने कार्य करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी बापु दासरी हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजक सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे हे तर प्रमुख पाहूणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, समाजभुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, यु.एस. ढाणकीकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल सावंत हे होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय पंतगे, विचारवंत प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख हे उपस्थित होते. सामाजिक न्याय दिनानिमित्त निबंध व वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राप्त मधुबाला संजय भोळे व नंदिनी भास्कर लोणे या विद्यार्थीनींना धनादेश देवून सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना यावेळी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी तर सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!