राज्यभरात 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन पदस्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना विहित कालावधी पुर्ण झाल्यानंतर नवीन पदस्थापना देण्याचे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी जारी केले आहेत.
राज्यभरात बदल्या हा प्रस्ताव प्रलंबितच राहिला होता. शासनाच्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित होत्या. काल दि.25 जून रोजी जारी झालेल्या आदेशानुसार राज्यभरातील 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना आपला विहित कालखंड पुर्ण केल्यानंतर नवीन ठिकाणी पदस्थापना देण्यात आल्या आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्यातून नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणार महाविर शिवाजी जाधव, वाशिम जिल्ह्यातून येणार विनोद मुंगसाजी झळके, या दोघांचा समावेश आहे. वाचकांच्यासोयीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बदल्यांच्या आदेशाची जारी केलेली पीडीएफ संचिका जोडली आहे.

70dc34fbc413fc3cf6f86bb12cfb4947

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *