26 लाखांच्या दरोड्याचा फिर्यादीच निघाला चोर

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूरमध्ये घडलेला 26 लाखांचा दरोडा हा फिर्यादीने स्वत:च घडविला होता. देगलूर पोलीसांनी 3 ते 4 तासातच या गुन्ह्यातील सर्व उकल करून आरोपींना अटक केली आणि दरोड्यातील सर्व रक्कम जप्त केली.
गणेश व्यंकटराव अचिंतलवार यांच्याकडे मागील 15 वर्षापासून चालक म्हणून कार्यरत असलेल्या कमलाकांत पांडूरंग नरबागे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी सकाळी 10 वजाता त्यांनी मालकाच्या आदेशाप्रमाणे 26 लाख 5 हजार रुपये एचडीएफसी बॅंकेत भरण्यासाठी घेवून जात असतांना दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.जी.9010 यावर आलेल्या दोन जणांनी त्याची कार थांबवून मागील सीटवर ठेवलेली 26 लाख 5 हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरून नेली होती. देगलूर पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 नुसार दोन अज्ञात दुचाकी स्वारांविरुध्द दुचाकी नंबरसह गुन्हा क्रमांक 270/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास त्वरीत प्रभावाने सुरू करून पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात त्वरीत हालचाल केली आणि दुचाकीवरील दोन्ही स्वार पकडले. पुढे माहित प्राप्त अशी झाली की, कमलाकांत पांडूरंग नरबाग यानेच या दोघांना सचिन चंद्रकांत बकरे (32) रा.सिध्दार्थनगर देगलूर आणि चंद्रशेखर विठ्ठलराव मलकापुरे (23) रा.देगलूर यातील चंद्रशेखर मलकापुरे हा सुध्दा गणेश व्यंकटराव चिंतलवार यांच्याकडेच नोकर आहे. या दोघांना सुपारी दिली होती. पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांनी कमलाकांत नरबागे, सचिन बकरे, चंद्रशेखर मलकापुरे या तिघांना अटक केली. सोबतच तक्रारीप्रमाणे बळजबरी प्रमाणे चोरलेले 26 लाख 5 हजार रुपये जप्त केले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *