भाजपाच्या पराभवातून अनेक त्रुटींचा अनुभव आला, पुढील निवडणुकीत त्यात सुधारणा करु-राधाकृष्ण विखे पाटील

 

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाने निवडणुकीतील त्रुटी लक्षात आल्या आहेत. यापुढच्या निवडण्ुाकांमध्ये त्या त्रुटी जनतेपर्यंत जाताना राहणार नाहीत, याची दक्षता घेवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले.

आज नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पराभवावर चिंतन करण्यासाठी ते नांदेडला आले होते. अगोदर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली असे विखे पाटील म्हणाले. त्यानंतर माझ्यासमोर कोणताही भेदभाव, गटबाजी आली नाही, असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात सकाळी झालेल्या राड्याला विखे पाटलांनी फाटा दिला.

माझ्यासोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. खंत याची आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला, पण प्रताप पाटील पराभवाने खचले नाहीत, आणि पुढील निवडणुकांसाठी त्यांनी पक्ष म्हणून संघटन मजबूत करण्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी बोलताना केंद्र शासनाने समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या योजनांवरील कामकाज मोजून दाखवले. तरी पण इंडिया आघाडीने संविधान बदलले जाईल हा नकारात्मक केलेला प्रचार मतदानासाठी महत्वपूर्ण ठरला आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला, असे विखे पाटील म्हणाले. इंडिया आघाडीने पसरविलेल्या नकारात्मक संविधान बदलाच्या प्रचाराला प्रभावी उत्तर देता आले नाही हे विखे पाटलांनी मान्य केले. चारशे पारचा नारा हा सुध्दा घातक ठरला, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीतून जनतेसमोर जातांनाच्या अनेक त्रुटी दिसल्या पुढील निवडणूकांमध्ये त्या त्रुटी पूर्ण करुन जनतेसमोर जावू, असे विखे पाटील म्हणाले.

राज्यात वाळू माफिया आहेत हे विखे पाटलांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मान्य करताना यापुढे मी मंत्रिमंडळात वाळू मुक्त असा प्रस्ताव घेवून जाणार आहे, असे विखे पाटील म्हणाले. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायत,  नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांच्याकडे बांधकाम परवानगी दाखल करताना त्या बांधकामासाठी किती वाळू लागेल याची रॉयल्टी भरुन तेथूनच बांधकाम करणार्‍यांनी आपल्याला जवळ पडेल अशा ठिकाणाहून वाळू मुक्तपणे घेवून जावी, असा या प्रस्तावाचा आशय असेल, असे विखे पाटील म्हणाले.

या पत्रकार परिषदेस माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, माजी आमदार अमर राजूरकर, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *