भोकर,(प्रतिनिधी)- आज दि.२१ जून ” जागतिक योग दिवस ” केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा.डॉ प्रताप चव्हाण वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर, मा. डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर तेथे साजरा करण्यात आला.
योग प्रशिक्षक डॉ. विजयकुमार दंडे, डॉ संदेश जाधव, डॉ सारिका जावळीकर यांनी योगा बदल माहिती, योगआसनाचे महत्त्व सांगीतले व प्रात्याक्षिक करून दाखविले.
आयुष विभागाचे डॉ विजयालक्ष्मी घोडजकर (किनीकर) यांनी प्रास्ताविक केले आभार प्रदर्शन डॉ थोरवट यांनी केले डॉ मुदशिर यांनी सहकार्य केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.