लोहा पोलिसांची अवैध बॅनर होर्डिंग विरोधात धडक मोहीम;10-12 जणांवर गुन्हे दाखल

लोहा (प्रतिनिधि)-शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर होर्डिंगचे फॅड आले असून छोटा कार्यक्रम असो का मोठा कार्यक्रम असो सर्व गोष्टीसाठी बॅनर लावले जातात.

या बॅनर मुळे अनेक वेळा रस्ते फोडले जातात रस्त्यांना छिद्र पाडले जातात इलेक्ट्रिक खंब्यांना बॅनर लावून इलेक्ट्रिक खंब्याचे नुकसान केले जाते. बॅनर अशा पद्धतीने लावले जातात कि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास चालणाऱ्या माणसास त्याचा त्रास होईल अडचण होईल.

अनेक वेळा बॅनर हे रस्त्याला एकदम चिटकून लावले जातात. यामुळे अनेक वेळा अपघातही होतात.

अनेक वेळा बॅनर हे इतके धोकादायक लावले जातात की ते पडून एखाद्याच्या जीवितास मालमतेस धोका होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. सध्या तर पावसाचे वाऱ्याचे दिवस आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर उडून फाटून इतरांना दुखापत होताना दिसते.

अशातच लोहा पोलीस यांनी आज रोजी महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विदृपीकरण अधिनियम 1995 कलम 3, भारतीय दंड विधान कलम 336,283 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ज्यांचे बॅनर आहे ज्यांच्यासाठी बॅनर लावले गेले. तसेच ज्यांनी बॅनर लावले ज्यांनी बॅनर छापले या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. लोहा पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या संबंधाने तात्काळ शहरांमध्ये पाहणी करून अवैधपणे लागलेले बॅनर काढून घेऊन जप्त केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब फौजदार रोडे साहेब पोलीस अमलदार केंद्रे लाडेकर किरपणे साखरे जामकर भाडेकर डफडे गिरे मेकलावाड ईजूळकुंठे शेळके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *