महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा

नांदेड- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त 23 जून रोजी सकाळी 11 वाजता जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नविन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी 23 जून रोजी सकाळी ठिक 11 वाजता जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नविन नांदेड येथे उपस्थित रहावे.

 

निबंध स्पर्धेचा विषय राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता दृष्टीकोण असून निबंध 1500 शब्दात लिहीण आवश्यक आहे. या स्पर्धेतुन प्रथम, व्दितीय, तृतिय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यांत येईल.

 

तसेच 23 जून रोजी दुपारी दोन वाजता सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती याविषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यांत आलेली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुलामुलींना भाग घेता येईल. सदर स्पर्धेतून प्रथम, व्दितीय व तृतिय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख परितोषीक व प्रमाणपत्र देण्यांत येईल.

 

या दोन्ही स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा. स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र घेवून स्वखर्चाने उपस्थित रहावे असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *