डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले

आरोपी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल

नांदेड(प्रतिनिधी)-डंकीन परिसरात अनोळखी युवकाचा खून झालेल्या प्रकरणात पोलीसांनी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल या व्यक्तीसह अनेक जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पोलीसांनी अनोळखी मयताचे प्रेत सापडल्यानंतर 24 तास पुर्ण होण्याअगोदर या गुन्ह्याची उकल केली आहे. परंतू अद्याप मरणारा कोण आहे याची माहिती प्राप्त झालेली नाही.

काल दि.19 जून रोजी दुपारी 2 वाजता डंकीन परिसरात, लिंगायत स्मशान भुमी परिसरात एका अनोळखी 25-30 वर्षीय युवकाचे प्रेत सापडले. रक्ताळलेल्या अवस्थेत असलेले हे प्रेत स्वत: सांगत होते की, त्याचा खून करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात माणसांविरुध्द अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीचा खून केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या पोलीस भरती सुरू असल्याने नांदेड शहरातील दोन्ही उपविभागांचे प्रभाग इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे आहे. मयत माणसाची कोणतीही ओळख नसतांना त्याचे मारेकरी शोधणे हे एक मोठे दिव्य काम होते. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मयताला काही जण रेल्वे स्थानक परिसरातून बळजबरीने ऍटो रिक्षात बसवित असतांनाचे फुटेज पोलीसांना सापडले आणि हाच तपासाचा धागा ठरला.

पोलीसांनी वृत्तलिहिपर्यंत अनेकांना याप्रकरणी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. परंतू शाहरुख घोडेवाला हा 22 ते 25 वर्षीय युवक मुख्य आरोपी मारेकरी असल्याचे सांगण्यात आले. इतर ताब्यात घेतलेल्या युवकाचा या प्रकरणी काय भुमिका आहे याचा शोध सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत मरण पावणाऱ्याचे नाव आणि त्याची ओळख पटलेली नाही असे सांगण्यात आले. परंतू ही माहिती काही जणांनी सांगितली की, मरणपावलेला व्यक्ती हा पॉकिट मार आहे. शाहरुख आणि त्याचे इतर मित्र अनेक पॉकिट मारांकडून हप्ता वसुल करतात आणि त्याच वादातून अनोळखी मयताचा खून केल्याचा प्रकार घडला असेल. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे पोलीस भरती प्रक्रियेत व्यस्त असतांना सुध्दा या घटेनवर लक्ष ठेवून होते. पोलीसांनी ज्या पध्दतीने अत्यंत द्रुतगतीने खूनाचा तपास लावला आहे. त्याच पध्दतीने मरणाऱ्याची ओळख पटविणे सुध्दा पुढचे काम आहे. कालच पोलीसांनी मयताची ओळख पटावी म्हणून जनेतला सुध्दा आवाहन केले होते.

संबंधीत बातमी…

25-30 वर्ष युवकाचा खून करून डंकिन परिसरात फेकले

2 thoughts on “डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *