सरसम हायवे पुलावर सापडलेल्या जखमी युवकाचा खूनच

नांदेड(प्रतिनिधी)-12 जून रोजी करंजी ते सरसम जाणाऱ्या हायवेच्या पुलावर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या 30 वर्षीय युवकाचा खून झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मारेकरी अज्ञात आहेत.
12 जूनच्या पहाटे एक रक्तभंबाळ अवस्थेतील 30 वर्षीय युवक सापडला. त्याच्या डोक्यात हातोडीने जबर मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले होते. हिमायतनगर पोलीसांनी त्याला उपचारासाठी नेले असतांना दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सुंदरबाई साईनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा आशिष साईनाथ जाधव रा.पवना ता.हिमायतनगर याचा खून कोणी तरी अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी केला आहे. युवकाला मारहाण झाली त्या ठिकाणी पोलीसांना हातोडी पण सापडली आहे. हिमायतनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 130/2024 खून या सदरात दाखल केला असून हियमायतनगरचे पोलीस उपनिरिक्षक आदिनाथ पाटील अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *