तलवारीच्या धाकावर दुचाकी जाळली

नांदेड(प्रतिनिधी)-रस्त्याने जातांना एका व्यक्तीला तीन जणांनी रोखून तलवारीच्या धाकावर त्याची दुचाकी जबरदस्तीने घेवून ती जाळून टाकल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसंानी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तिरुवनस मुत्तुस्वामी एम हे बोअरवेल ऑपरेटर आहेत. ते तामिळनाडु येथील रहिवासी आहेत. पण सध्या ते पावडे पेट्रोल पंपाजवळ राहतात. दि. 13 जून रोजी ते आपली दुचाकी क्रमांक एम.टी.09 एक्स एल 5348 वर बसून जयभिमनगर येथून जात असतांना विवेक नवघडे, सौरभ संतोष माने, प्रेम रामभाऊ शिंदे व इतर दोघांनी त्यांना अडवले आणि तलवारीच्या धाकावर त्यांची दुचाकी हिसकावून घेवून ती जाळून टाकली. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार दरोडा या सदरात गुन्हा क्रमांक 199/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *