भाऊ आणि बहिणीनी मिळून 50 हजारांची खंडणी मागितली

नांदेड(प्रतिनिधी)-बहिण आणि भावाने मिळून एका व्यक्तीला 50 हजार रुये दे नाही तर तुझ्यावर खोटी केस करतो म्हणून धमकी दिल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल नाराणराव चंद्रमोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ते स्विस बेकरी श्रीनगर येथे असतांना वनिता माधवराव भालेराव आणि त्यांचा भाऊ गजानन उर्फ विजय माधवराव भालेराव दोघे रा.सुमेधनगर कॅनॉल रोड नांदेड यांनी तुमचे व्हाटसऍप व टेक्स मेसज कार्यालयातील गु्रपवर व्हायरल करून तुमची बदनामी करतो नाही तर तुमच्या विरुध्द खोटी तक्रार करतो असे सांगून जिवे मारण्याची धमकी देवून 50 हजार रुपये खंडणीची मागणी केली. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 241/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कुकडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *