नांदेड(प्रतिनिधी) -आज मेवाडचे राजे, विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जन्मोत्सवदिनी अनेक कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करून अन्नदान केले.
आज महाराणा प्रतापसिंहजी यांचा 484 वा जन्मोत्सव सोहळा आहे. भगवानसिंह चंदेल, मोहनसिंह तौर, बालाजी चव्हाण, अर्जुन ठाकूर, अमरसिंह चव्हाण, शरदसिंह चौधरी, बाबुसिंह चव्हाण, उध्दव कल्याणकर, प्रदिप व्यवहारे, महेंद्रसिंह ठाकूर, विठ्ठलसिंह गहेरवाल, बलदेवसिंह चव्हाण, राजूसिंह चंदेल, भरतसिंह ठाकूर, गजेंद्रसिंह चंदेल, मुन्नासिंह परदेशी, दिपक ठाकूर, गोविंदसिंह चौधरी, संतोषसिंह चौधरी, बाळु सहारे, पवनसिंह बैस, डॉ. राम चव्हाण, जितूसिंह चंदेल, ऍड.दिपक शर्मा आणि अनेक राजपुत समाजातील कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यासमोर जमून महाराणा प्रतापसिंहजी यांना अभिवादन केले. तसेच त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या लोकांना अन्नदान केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात महाराणा प्रतापसिंहजी यांना अभिवादन
विरशिरोणमणी महाराणा प्रतापसिंहजी यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
9 जून रोजी महाराणा प्रतापसिंहजी यांची तिथीनुसार जयंती आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक प्रशांत कांबळे यांनी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, मारोती कांबळे आणि विनोद भंडारे यांनी केले.