· जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन मोठया उत्साहात साजरा
· भगव्या ध्वजासह उभारली शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेत सहा जून या ऐतिहासिक पर्वावर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. राज्य शासनाने शिवस्वराज्य दिनाच्या पर्वावर शिवचरित्राचे स्मरण नव्या पिढीला करण्याची दिशा दिली आहे . शिवस्वराज दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नव चेतना मिळते असा पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश यावेळी प्रसूत करण्यात आला.
शिवराज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला. शिवछत्रपतीनी तत्कालीन प्रस्थापित सत्तेला पालथे करून स्वताच्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र असा मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली. म्हणून हा दिवस” शिवस्वराज्य दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने सन 2021 मध्ये घेतला. तेव्हापासून आपण हा दिवस ” शिवस्वराज्य दिवस साजरा” करतो.
नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने आज शिवस्वराज्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेत केले आहे. या सहळ्याचे आयोजन प्रेरणादायी असून या नियोजनाद्वारे आपल्या अजरामर अशा इतिहासातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते असे गौरवोद्गार राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले. शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्ह्यातील समस्त जनतेला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने आज 6 जून रोजी 351 वा शिवस्वराज्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी व्ही.आर. बेतीवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, कार्यकारी अभियंता अे.आर. चितळे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र गीत गायना राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शाहीर प्रकाश दांडेकर तसेच शाहीर रमेश गिरी व त्यांच्या संचानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा तसेच त्यांच्या जीवनावर गीतगायन केले. त्यानंतर किड्स किंग्डम पब्लिक स्कूल (श्रीचैतन्या टेक्नो स्कुल) येथील विद्यार्थ्यांनी बॅड पथकाव्दार मराष्ट्र गीते सदर केली. तर गुरुकुल पब्लिक स्कुलचे विद्याथी शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशषभूषेत दाखल झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद्दमाकर कुलकर्णी व प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचा-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.