नांदेड(प्रतिनिधी)-सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची पेरणीच्या मशागतीची कामे आता पुर्णत्वास येत आहेत. त्यांना खरीप हंगामासाठी रासायनिक खताबरोबरच बियाण्यांची आवश्यकता असते. पण कंपन्यांच्या आडमुठी धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी मापक दरात रासायनिक खते आणि कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी श्रीहरी कृषी सेवा केंद्राचे अजितकुमार पााटील यांनी जिल्हा कृषी अधिक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप हंगाम सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी कापुस बियाणे आणि रासायनिक खतांची उपलब्धता लक्षात घेवून मापक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे. सध्या रासायनिक खते हे शेतकऱ्यांना लिंकींग केल्याशिवाय मिळत नाहीत. कंपनीच्या या अडमुठी धोरणामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर ुसरीडे खता्यज्ञा बॅगा घेत असतांना यामध्ये डीएपी, 10:26:26 अशा खतांसोबत इतरही काही खतांच्या बॅगा यामध्ये झिंक, सल्फर यासारखे खते सोबत घ्यावे लागत आहेत. यााचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. तर दुसरीकडे कापसाच्या बियाण्यांची कृत्रित टंचाई करून चढ्या दराने कापसाच्या बॅग विक्री करत आहेत. यामध्ये कापसाच्या बियाण्याबाबत दि.1 जून रोजी नवा मोंढा नांदेड येथील कृषी दुकानावर चौकशी केली असता कॉटन ऑन व लिंकींग शिवाय ते मिळणार नाहीत असे सांगितले. यात अनेक वान एकास दोन असे देत आहेत. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीमध्ये विक्री होत नसून जास्तीची किंमत घेवून शेतकऱ्यांना बि-बियाणे दिले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कापुस बियाणे मापक दरात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याके एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.