अर्धापूर,(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार रात्रीची गस्त ड्युटी करत असताना एका वाहन पोलीस अंमलदार ते तपासत असलेल्या वाहनाला मागून धडक दिल्यामुळे उभे असलेले वाहन पोलिसा अंमलदाराच्या डोक्याला धडकले आणि त्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. काम करत असताना पोलिसावर ओढवलेला हा प्रसंग दुर्दैवी आहे. याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बकल नंबर 1766 राम मुगाजी पवार हे 31 मे ते एक जून दरम्यानच्या रात्री 2.30 वाजता गस्त करत असताना त्यांनी चोरंबा फाट्याजवळ एक चार चाकी गाडी उभी केली आणि तिची तपासणी करत असताना त्या त्या गाडीला पाठीमागून दुसरा एका वाहनाने धडक दिली आणि तपासणी सुरू असलेले वाहन राम पवार यांच्या डोक्यात जोरदारपणे धडकले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी त्यांना त्वरित उपचारासाठी नेले होते मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राम मुगाजी पवार (56)हे आष्टुर तालुका लोहा येथील रहिवासी असून अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती घटनेची माहिती मिळताच अर्धापूर चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे घटन्थळी दाखल ाले आहेत इतर कायदेशीर प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू आहेत. राम मुगाजी पवार यांच्या मृत्यूची हळहळ व्यक्त होत आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
राम मुगाजी पवार यांचे भाऊ विनायक मुगाजी पवार हे सन 1991 मध्ये पोलीस सेवेत भरती झाले होते त्यातील विनायक पवार काल दिनांक 31 मे रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.