नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे अनेक नागरीकांचे मोबाईल चोरट्यांनी दुचावरून लांबविल्याचे प्रकार घडले होते. त्यातील काही प्रकार स्थानिक गुन्हा शाखेने तिन जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अब्दुल मुजीब अब्दुल हमीद(45) रा.खडपुरा नांदेड तसेच शेख इरफान शेख इस्माईल(36) रा.दुलेशाह रहेमाननगर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे दोन चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. हे दोन आरोपी पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील गुन्हा क्रमांक 110/2023 साठी त्यांच्या ताब्यात दिले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी काबरानगर भागातील वैभव महेंद्र सुर्यतळे याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 2 लाख 72 हजार रुपये किंमतीचे 13 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. त्याने गुन्हा करतांना वापरलेली 50 हजार रुपयांच्या स्कुटीसह 3 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्याने वजिराबाद, भाग्यनगर येथे दोन असे तिन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, महेश बडगु, रणधिरसिंह राजबन्सी, गजानन बैनवाड, देविदास चव्हाण, ज्वालासिंग बावरी, मारोती पवार, मारोती मोरे, बालाजी मुंडे, शंकर केंद्रे, सायबर सेलचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, राजू सिटीकर आदींची कौतुक केले आहे.