नांदेड(प्रतिनिधी)-पावर पेपर समुहातील नांदेडच्या एका उपसंपादकाने नरेंद्र मोदीची जाहीरात छापली नाही आणि 4 लाख रुपये परस्पर गायब केल्याचा अजब प्रकार घडला आहे. या संदर्भाची चौकशी करण्यासाठी पावर समुहाचे संपादक नांदेडला येवून गेल्याची चर्चा सुरू आहे.
दि.20 एप्रिल 2024 रोजी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुक प्रचाराची सभा झाली. या सभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काही वगळता सर्वच प्रसार माध्यमांना भरघोस जाहीराती दिल्या होत्या. प्रसार माध्यमांसाठी निवडणुकीचा काळ सुगीचा काळ असतो. कारण आता प्रसार माध्यमांनी सुध्दा आपल्या मुळ कामाला अर्थात रॉबर्ट या ब्रिटीश पत्रकाराने सांगितल्याप्रमाणे जे सत्ताधिशांना छापावे वाटत नाही तेच छापने खरी पत्रकारीता आहे. इतर बातम्या फक्त पर्सनल रिलेशनशिप आहे. म्हणजेच प्रसार माध्यमांनी याचा धंदा तयार केला आहे. ते सुध्दा ठिक आहे. त्यासाठी मोठ्या प्रसार माध्यमांमध्ये जाहीरात विभाग वेगळा असतो. पण प्रत्यक्षात आम्हीच त्याचे सर्व काही आहोत असे वृत्तमानपत्रांचे प्रतिनिधी, उपसंपादक सांगत असतात आणि त्यावर सर्वांना विश्र्वास असतो. कारण तीच मंडळी नेत्यांना दररोज भेटत असते. असो प्रत्येकाने आप-आपला व्यवसाय आपल्या फायदासाठी सुरू केलेला आहे. त्यात आम्हाला काही दुखण्याचे कारण नाही.
20 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीने जवळपास 4 लाख रुपयांची जाहीरात दिली होती अशी माहिती प्राप्त झाली आहे. पण 20 एप्रिलचा पावर पेपर समुहााचा वर्तमान पत्र पाहिला असता त्यात मोदींच्या सभेची जाहीरातच छापून आलेली नाही. नांदेडच्या एका उपसंपादकाने ते 4 लाख रुपये परस्पर गायब केल्याची चर्चा हळूहळू पावर पेपर समुहापर्यंत पोहचली. यातील सत्य जाणून घेण्यासाठी पॉवर पेपर समुहाचे संपादक सुध्दा नांदेडला येवून गेल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण त्यातून काय निष्पन्न झाले याची माहिती प्राप्त करण्यात आम्ही असमर्थ ठरलो. सध्या ते उच्चशिक्षीत उपसंपादक सुट्टीवर असल्याची माहिती सुध्दा प्राप्त झाली. अशी परिस्थिती पॉवर पेपर समुहात असेल तर इतरांनाा दोष देण्यात आम्ही झिजवलेली लेखणी चुकली होती असेच म्हणावे लागेल. भारताच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली प्रसार माध्यमातील काही मंडळी अशी वागत असतील यानंतर काय म्हणावे. आम्हा प्राप्त झालेली माहिती फक्त भारतीय जनता पार्टी या पक्षाची आहे. इतर राजकीय पक्षांनी दिलेल्या जाहीरातींमध्ये काय-काय गोंधळ झाला असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण नांदेडमध्ये जाहीरातींचा 52 टक्यांचा धंदा शिकवणारा एक महान पत्रकार आज ज्येष्ठ पत्रकार म्हणवला जातो. त्याच्याच नादात पावर पेपर समुहाच्या उपसंपादकाने ही बाब शिकली असेल?