नांदेड(प्रतिनिधि)-पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्हयातील वारंवार गुन्हे करणारे, सराईत गुन्हेगार, लपुन छपुन अवैध्य धंदे करणारे इसमांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन त्यांचे हद्यीतील सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यासंबंधाने 30 MPDA प्रस्ताव पाठविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नमुद प्रस्ताववर कार्यवाही चालु आहे.
पोलीस ठाणे अर्धापुर यांचेकडुन कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावमध्ये सुरेंद्रसिंग ऊर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले (वय 22) रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड, जसप्रितसिंग ऊर्फ यश गेदासिंग कामठेकर (23) रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड, शुभम राजकुमार खेलगुडे (24) रा. बंदाघाट नांदेड, शरनपालसिंग गुरमितसिंग रागी (26) रा. गुरुव्दारा गेट नंबर 4 नांदेड, जसलोकसिंघ नवनिहालसिंघ कारीगीर ( 20)रा. यात्रीनिवास नांदेड यांना एक वर्ष कालावधी साठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार केले बाबतचे आदेश व पोलीस ठाणे विमानतळ यांचेकडुन कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावमध्ये गुरुप्रितसिंग पि. गुलजारसिंग खैरा (44) व्यवसाय चालक रा. दशमेशनगर, बाफना रोड, नांदेड, करणसिंग राजविरसिंग शाहु ( 32 ) व्यवसाय खा. नौकरी रा. गुरुव्दारा गेट नंबर 3, नांदेड, सरहाण अली अलकेरी (44) व्यवसाय व्यापार रा. आरबगल्ली दरबार मस्जीदजवळ इतवारा नांदेड यांना सहा महीणे कालावधीसाठी नांदेड जिल्हयातुन हद्दपार केले बाबतचे आदेश दिनांक 17 मे 2024 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पारीत केले आहेत.
नांदेड जिल्हयात गुन्हेगाराच्या टोळ्या करुन गुन्हे करणारे इसमांविरुध्द कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये प्रस्ताव पोलीस ठाणेकडुन पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आले होते. मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये सन 2023-24 या कालावधीत नांदेड जिल्हयातील विविध 23 टोळ्यामधील 70 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार केले आहे. तसेच MPDA अंतर्गत 14 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
आणखी नांदेड जिल्हयात टोळीने गुन्हे करणारे आरोपीतांविरुध्द प्रस्ताव पाठवुन त्यांना हद्दपार/स्थानबध्द करण्याची प्रक्रिया चालु आहे.