नांदेड(प्रतिनिधी)-सिडको येथील हिंदु कुलभूषण महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्या मागील इमारतीवरील अनाधिकृत होर्डिंग काढण्याबाबतचे निवेदन राजपूत करणी सेनाने दिले आहे.
सिडको येथील विरशिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यामागे असलेल्या इमारतीवर 7 वर्षापासून 60 फुट उंच व 120 फुट रुंद असे होर्डिंग लावलेले आहे. मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्वांनाच होर्डिंग विषयी जाग आली आणि सिडको येथील होर्डिंग सुध्दा मोठ्या स्वरुपाची आहे. यदा-कदा वादळी वाऱ्याने ते होर्डिंग पडले तर ते थेट विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यावर पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली. 25 एप्रिल 2022 रोजी सुध्दा या बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यात तत्कालीन आयुक्तांनी हे होर्डिंग काढण्या बाबतच्या सुचना दिल्यानंतरही ते होर्डिंग आजही तसेच आहे. घाटकोर मुंबई येथे पडलेल्या होर्डिंगमध्ये 15 लोकांचा जिव गेला होता याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. 10 दिवसात हे अनाधिकृत होर्डिंग काढले नाही तर राजपुत करणी सेना, सर्व राजपूत समाज आणि हिंदु समाज रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी राजपूत करणी सेना नांदेडचे पदाधिकारी, युवा राजपुतांना गु्रप सिडको, श्री क्षत्रीय राजपूत युवा संघ नांदेड, राजपूत स्टॉक फोर्स नांदेड यांचे व इतर हिंदु समाजाचे बांधव, संतोषसिंह चौधरी, गजाननसिंह चंदेल, ओमसिंह परमार, कृष्णासिंह ठाकूर, अर्चितसिंह चौधरी, विजयसिंह गौर, शक्तीसिंह परमार, विजयसिंह ठाकूर, दिनेशसिंह ठाकूर, दुर्गेशसिंह ठाकूर, सत्येंद्रसिंह ठाकूर, विजेंद्रसिंह ठाकूर, गोविंदसिंह ठाकूर आदी निवेदन देतांना उपस्थित होते.