पावेडवाडीच्या नागरीकांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेड(प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे तिव्र दिवस असल्याने व नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयाच्या तांत्रिक अडचणीमुळे शहरालगत असणाऱ्या पावडेवाडी परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
नांदेड शहरालगत असणाऱ्या व नांदेडचाच भाग म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या वाडी (बु) येथे मागील 27 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. विष्णुपूरी धरणातून होणारा पाणी पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे बंद झाला. वाडी बरोबर नांदेड शहरातील नागरीकांना सुध्दा याचा चांगलाच फटका बसला होता. विष्णुपूरी येथील पंप हाऊसचे काम सुरू आहे. पण ते काम पुर्ण झाल्यानंतर वाडीकरांना पाणी मिळू शकेल असे मनपा आयुक्तांनी सांगितले होते. पण या भागातील नागरीकांना आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून त्यांच्याकडून पाणी प्रश्न सोडविण्याची विनंती केली.
यावेळी डॉ.विठ्ठल पावडे, डॉ.भारती मढवई, डॉ.दिलीप शिंदे, विशाल जाधव, शिवशंकर गव्हाणे, मधुकर धर्मापुरीकर, यांच्यासह आदी जणांची यावेळी उपस्थिती होती.
अन्यथा तिव्र आंदोलन करून -विठ्ठल पावडे
सोमवारी पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंगे्रसचे जिल्हा उ पाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *