भोकर – आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस दि.१२ मे हा दिवस ” जागतिक परिचारिका दिन ” म्हणून साजरा केला जातो.
जगभरात १२ मे हा जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो.
फ्लोरोन्स नाइटिंगेल त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो.
वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” जागतिक परिचारिका दिन ” रविवार, दि. १२ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
फ्लोरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सर्व अधिपरीचारिका यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्रीमती मुक्ता गुट्टे आरोग्य सेविका यांनी प्रतिज्ञा वाचन केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी डॉ. कळसकर मॅडम, अधिपरिचारीका श्रीमती संगीता ताटेवाड, निलोफर पठाण, संगिता महादळे, दिक्षा पाटील, श्रीमती माटोरे, श्रीमती डवरे, छाया बोड्डेवाड, ज्योती काळे आदी कर्मचारी उपस्थित होते.