नांदेड(प्रतिनिधी)-पावसाळा अद्याप सुरूच झाला नाही आज आलेल्या अवकाळी पावसाने महानगरपालिकेच्या कामकाजाचे अर्थात साफसफाई धिंदवडे काढून टाकले. अनेक सखल भागांमध्ये नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमध्ये तुंबून घरात शिरत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पावसाने हजेरी लावलीच. उद्या अजूनही दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज फक्त दोन तास पाऊस पडला. पण पाऊस मात्र जोरदार होता. सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास पावसाने थोडी उसंत घेतली आहे. पण वातावरण ढगाळच आहे. यावरून पुन्हा पाऊस पडेलच अशी परिस्थिती दिसते.
दोन तास पडलेल्या पावसाने महानगरपालिकेच्या आम्ही नंबर 1 या वल्गनेची लकतरे काढली. शहरातील सर्वच नाल्या साफसफाई न झाल्यामुळे तुंबल्या आणि पाऊस आला. ते पावसाचे पाणी नाल्यांमधून बाहेर जाण्यासाठी मार्ग उरला नाही आणि तुंबलेल्या नाल्या आणि त्यात झालेला पाऊस यामुळे त्या नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आले. नुसतेच रस्त्यावर आले नाही तर ते तुंबलेले पाणी शहरातील सखल भागात असलेल्या अनेक घरांमध्ये शिरले आहे. यामुळे महानगरपालिकेचा कर वसुल करतांना लोकांच्या संपत्या सिल करून त्याचे फोटो व्हायरल करण्यात किंबहुना प्रसार माध्यमांना पाठविण्यात महानगरपालिकेला जेवढा रस आहे. त्यापेक्षा जास्त रस तुंबलेल्या नाल्या साफ करण्यामध्ये असायला हवा. कारण त्यामुळे रोगराई उदभवी तरी ते काम सुध्दा महानगरपालिकेलाच करायचे आहे.
जिल्हाभर पाऊस
प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहायला सुरू होताच बहुतांश ठिकाणची विज गुल झाली. त्यामुळे वेगळ्या समस्यांना जनतेला सामोरे जावे लागले. पडलेल्या पावसाने लाही लाही झालेल्या लोकांना तात्काळ थोडासा दिलासा मिळाला असला तरी उद्या पुन्हा वातावरण जास्त गरम होईल असे जाणकार सांगतात. काही तज्ञांच्या मते यंदा मान्सुन लवकरच येणार आहे. कारण समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालेलाा आहे. आम्ही निसर्गाचा केलेला ऱ्हास हाच याचा परिणाम आहे असेही लोक सांगतात. मान्सुन लवकर हजर झाला तर पिकांना ज्यावेळेस खरी पाण्याची गरज आहे. त्यावेळी पाणी पाऊस येणार नाही. एकूणच निसर्गाच्या मर्जित काय आहे हे आज लिहिने अवघड आहे.