नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा तुमची जबाबदारी वाढविणारा आहे असे सांगितले.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील महाराष्ट्र स्थापना दिवसाचे ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सात पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या पोलीस अंमलदारांमध्ये दिलीप पुनमचंद जाधव-एटीएस नांदेड, दिगंबर पंढरीनाथ मुदीराज-वाचक शाखा, विक्रम बालाजीराव वाकडे-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, संतोष विश्र्वनाथ सोनसळे-पोलीस मुख्यालय नांदेड, मोहम्मद असलम मोहम्मद हनीफ-एटीबी नांदेड, सिध्दार्थ पुरभाजी हाटकर-नागरी हक्क संरक्षण नांदेड, दिनेश पारप्पा वसमतकर-लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचा समावेश आहे.
याप्रसंगी पुढे बोलतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले तुम्ही आपल्या जीवनात केलेल्या कामाचा सन्मान म्हणूनच तुम्हाला पोलीस महासंचालकांनी सन्मान चिन्ह प्रदान केले आहे. आपल्याला मिळालेल्या सन्मानानंतर आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. तेंव्हा पुर्वीपेक्षा जास्त चांगले काम करून पोलीस दलाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम., पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांची उपस्थिती होती.