नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल एवढेच सोडा-आपल्या नायगाव मतदार संघासाठी काय करता येईल याबाबतीत न बोलता साखर कारखान्याबाबतीत बोलल जात आहे. मात्र खेद जणक आहे. आयुष्यात साधी पिठाचीही गिरणी उभी केली नाही ते लोक सहकार क्षेत्राबाबत बोलत आहेत. हे मात्र खैदजणक आहे असे मत खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल.
या पत्रकार परिषदेला खा.डॉ.अजित गोपछडे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, प्रविण साले, महेश खोमणे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना खा.अशोक चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील शेवटच्या टप्यात ही निवडणुक आली आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून मतदारांच्या दारापर्यंत जावून आम्ही विकासाच्या बाबतीत प्रचार केला. सध्या भाजपसाठी वातावरण अनुकूल आहे. जनतेने मोदीवर विश्र्वास ठेवून नांदेडचा उमेदवार निश्चितच विजय होईल असा विश्र्वास आम्हाला वाटतो. विरोधकांकडे सध्या विकासाचे मुद्दे नाहीत. केवळ विरोधकांकडून प्रचारात अशोक चव्हाण यांनाच लक्ष केल आहे. नांदेड जिल्ह्याने नेहमीच सकारात्मक मानसिकतेला साथ दिली. यामुळे येणाऱ्या काळातही विरोधकांच्या नकारात्मकतेला नांदेडकर साथ देणार नाहीत. मागील 15 वर्षापासून आदर्श याच नावाखाली विरोधक चर्चा करतात. पण आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणेने माझी कुठलीही चौकशी केलेली नाही. आदर्श प्रकरणात न्यायालयाने मला क्लिनचिट दिली आहे. तरी देखील विरोधक मात्र निवडणुका आल्या की, आदर्शचा मुद्दा काढतात. आदर्श प्रकरण हे कॉंग्रेसच्याच काळात घडलेल आहे. यात भाजपचा काही एक संबंध नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे 20 एप्रिल रोजी जाहीर सभा झाली होती. या सभेत मोदी यांनी आजवर नेहमीच लोक लोकसभा निवडणुक लढत असलेले अनेक नेते लोकसभेचे मैदान सोडून राज्यसभेत जाण पसंत करत आहेत. असे वक्तव्य केल होते. पण हे विधान माझ्यासाठी नाही कारण मी आता कॉंगे्रसमध्ये नसून भाजपमध्ये आहे, हे विधान कॉंगे्रसमधील नेत्यांसाठी होत. आज काल सोशल मिडीयावर आपल्या सोयीप्रमाणे विधानाचा वापर करत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात केला जात असल्याची टिका खा.अशोक चव्हाण यांनी केली.
विरोधकांनी सध्या प्रचाराची पातळी खालच्या स्तरावर नेही आहे. ज्यांनी आपल्या भागात साधी पिठाची गिरणीही आणली नाही. त्यांनी मात्र सहकार क्षेत्रात बाबत बोलू नये. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला 150 कोटीच कर्ज देण्यात आल आहे. हे अनुदान नाही. हे व्याजासहीत कर्ज परत कराव लागणार आहेे असेही ते म्हणाले. सध्या विरोधक मोठ्या प्रमाणात अपप्रचार आणि गैरसमज निर्माण करत आहेत. नरसी येथे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नांदेड शहरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील काही मुद्दे घेवून विरोधक अपप्रचार करत आहेत असा पुर्नउच्चार खा.चव्हाण यांनी केला आहे. विरोधकांकडून संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे. पण सुप्रिम कोर्टाच्या गॅजेटमध्येच नोंद आहे की, संविधानाचा मुळ गाभा कोणालाही बदलता येणार नाही. हे असतांनाही विरोधक मात्र खोटा प्रचार करत आहेत. देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा आकडा निश्चित पार होईल. यामध्ये नांदेडचाही सहभाग असणार आहे. पुढील पाच वर्षाच्या विकासासाठी व विकसीत भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी नांदेडकरांंनी नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक भुमिका घेणाऱ्या भाजपला विजयी करावे असे आवाहनही खा.अशोक चव्हाण यांनी केले.