नांदेड – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदारसंघ असे एकुण 8 विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना नियुक्त विधानसभा मतदारसंघ कार्याक्षेत्र हद्दीपर्यंत 19 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2024 पर्यंतच्या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
तर 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ या एका विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना नियुक्त विधानसभा मतदारसंघ कार्याक्षेत्र हद्दीपर्यंत 30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 7 मे 2024 पर्यंतच्या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. उक्त संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 10 एप्रिल 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.