नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाने सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या करतांना राज्यातील 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशा एकूण 653 बदल्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन जिल्हा न्यायाधीश बदलून जात आहेत आणि तीन नवीन येत आहेत दोन जणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर.एन.जोशी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात एकूण 653 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील दोन जिल्हा न्यायाधीश बदलून जात आहेत आणि तीन नवीन येत आहेत. नांदेड येथील न्यायाधीश एस.ई.बांगर सीटी सिव्हील कोर्ट मुंबई येथे जात आहेत. मुखेड येथील एस.एस.गोवंडे हे औरंगाबाद येथे जात आहेत. सोलापूर येथील एम.एन.दळवी आणि नाशिक येथील श्रीमती आर.एम.शिंदे नांदेडला येत आहेत. नेवासा जि.अहमदनगर येथील संतोष देशमुख यांना नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे पाठविले आहे.
राज्यात 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नांदेड येथील एस.ए.खलाने मॅट्रोपॉलीटीन न्यायालय मुंबई येथे जात आहेत. नाशिक येथून एस.ए.इंदलकर हे नांदेडला येत आहेत. माजगाव पिता न्यायालयातून श्रीमती व्ही.जे.कोरे नांदेडला येणार आहेत. कोल्हापूर येथील पी.एम. पाटील यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पाठविण्यात आले आहे. कंधार येथील आर.आर.राऊत यांना मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्यात 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यांची जुनी नियुक्ती आणि कंसात नवीन नियुक्ती दिली आहे. जे.डी.जाधव-नांदेड (श्रीरामपूर अहमदनगर), एस.बी.अंभोरे-किनवट नांदेड(नांदगाव खांडेश्र्वर अहमदनगर), व्ही.जी.पवारे-किनवट नांदेड (भातकुठी अमरावती), एम.डी.बिरहारी-अर्धापूर नांदेड (एम.व्ही.कोर्ट नागपूर), श्रीमती एस.एम.बिरहारी-नांदेड(नागपूर), श्रीमती पी.व्ही.चिरडे-बेलापूर ठाणे (लोहा नांदेड), पी.एम.माने-खालापूर रायगड(किनवट नांदेड), के.जी.मेंढे-कुरखेडा गडचिरोली(किनवट नांदेड), ए.बी.जाधव-जत सांगली(हदगाव नांदेड), पी.डी.आझादे-कंधार नांदेड(नागभिड चंद्रपुर), राहुल शिंदे-वाशिम(नांदेड), के.एस.कंधारे-भुसावळ जळगाव(कंधार नांदेड), एम.एम.घोरपडे-जुन्नर पुणे(अर्धापूर नांदेड), श्रीमती एस.एल.सोयंके-नांदेड(भंडारा), रुहिना अंजूम-नांदेड(सहाय्यक धर्मदाय आयुक्त मुंबई), श्रीमती खतीब आर.ए.ए.-कंधार नांदेड(मुदतवाढ), आर.आर.अभ्यंकर-मोरशी अमरावती(मुखेड नांदेड), व्ही.एम.गायकवाड-लोहा नांदेड(साकोली भंडारा), एम.एस.पोळ-मुखेड(यवतमाळ), एस.बी.ढेंबरे-मुखेड नांदेड(मुदतवाढ).
उच्च न्यायालयाने केलेल्या बदल्यांची राज्यभरातील न्यायाधीशांच्या बदली आदेशाच्या पीडीएफ संचिका अनुक्रमे बातमी सोबत वाचकांच्या सोयीसाठी जोडल्या आहेत.