नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असतांना गोदावरी नदी घाटातून वाळू उपसण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. सर्व यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही अशी परिस्थिती आहे. नांदेड येथील एका पत्रकाराने मॉर्निंग वॉकच्या काळात शहरातील गोवर्धनघाट पुलावरुन रेती उपस्याचे घेतलेले हे छायाचित्र आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरून फेसबुकवर प्रसारीत केले. आपल्या शब्दात आपल्या भावना सुध्दा पत्रकाराने त्यात व्यक्त केल्या. परिस्थिती अशी दिसते की कोणीही काहीही बोलणार नाही. म्हणूनच एकाच रांगेत अनंत गाड्या उभ्या असून नदीतून वाळू काढून त्यात भरण्याचे काम सुरू आहे. बहुदा लोकसभा निवडणुकीमुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यातच व्यस्त आहे. म्हणूनच बहुदा या अवैध रेती उपस्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. Kanthak Suryatal Post Views: 1,313 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी ओव्हरलोड विटांच्या पाच गाड्या पकडल्या; 1 लाख 40 हजारांचा दंड छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र