सीआयडी असल्याचे सांगून 70 वर्षीय व्यक्तीची फसवणूक

 

नांदेड(प्रतिनिधी)-सीआयडीचे व्यक्ती आहोत असे सांगून एका 70 वर्षीय व्यक्तीच्या हातातील 25 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करून काढून घेण्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत घडला आहे.

प्रकाश नामदेव कांबळे (70) रा.हडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मार्चच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास ते गोविंद गार्डन जवळून जात असतांना दोन जण आले आणि आम्ही सीआयडीचे लोक आहोत, इकडे चोऱ्या खुप होत आहेत, तुम्ही सोन्याची अंगठी का घातली आहे असे बोलून त्यांना ती अंगठी काढायला लावली आणि त्यांचा विश्र्वासघात करून ती 5 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 25 हजार रुपये घेवून गेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *