दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल

 

विविध विभागांचा आढावा ; खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन

नांदेड  : -नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज त्यांनी विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवाराच्या व राजकीय पक्षाच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१-मुखेड या तीन विधानसभा क्षेत्रातील खर्चावर निरीक्षण ठेवण्याची जबाबदारी मगपेन भुतिया यांची आहे. मगपेन भुतिया हे देखील शासकीय विश्रामगृह येथे निवासी असून त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये खर्चाच्या संदर्भातील कुठल्याही तक्रारी गाऱ्हाणी व सूचनांसाठी संपर्क साधता येऊ शकतो त्यांचा दूरध्वनी क्रमांक 8902196177 आहे. नागरिकांनी निवडणूक संदर्भातील कामांसाठी त्यांना गरजेनुसार माहिती देण्याच्या आवाहनही त्यांनी केले आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून यापूर्वीच डॉ. दिनेश कुमार जांगिड हे दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *