आठ वर्षाच्या अब्दुल खादर ने पूर्ण केला पहिला रोजा

नांदेड(प्रतिनिधि)-इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, खडकपुरा नांदेड येथील अब्दुल खादर उर्फ अबुजर या आठ वर्षाच्या चिमुकल्याने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १३ तासांचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. विश्वनिर्मात्या अल्लाह प्रति कृतज्ञ बनण्याच्या प्रवासात हे त्याचे पहिले पाऊल असून, इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्याने सिद्ध केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.१२ मार्चपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, दिव्य कुरआन याच महिन्यात अवतरीत झाल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेऊन अल्लाह प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात.लहान मुलांना ईशपरायणता आणि संस्कारक्षम व्यक्ती बनविण्यासाठी त्यांना बालवयापासूनच प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने रोजा ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. रमजान महिन्यातील उपवास हे ईशकृतज्ञ होण्यासाठी आवश्यक आणि संस्कारक्षम व चारित्र्य संपन्न व्यक्ती होण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग असल्याचे मानले जातात.नांदेड शहरातील खडकपुरा येथील अबुजर हा फुलेनगर येथील जिजामाता शाळेचा विद्यार्थी असून दुसरी वर्गात तो शिक्षण घेत आहे. अवघ्या आठ वर्षाच्या या चिमुकल्याने काल दिवसभर रोजा ठेऊन अल्लाह प्रति कुतज्ञ होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली आह. भविष्यात संस्कारक्षम आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती होण्याच्या मार्गात पहिले पाऊल ठेवले आहे.अबूजर ने रोजा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि शेजारी देखील त्याचे कौतुक करत आहेत. अबुजर हा पत्रकार हैदर अली यांचा मुलगा आहे आणि महापालिकेचे सेवानिवृत्त बिल कलेक्टर गुलाम दस्तगीर यांचा तो नातू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *