राहुल गांधी यांचे विधान हास्यास्पद-खा.चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-खा.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबई येथील शिवाजी पार्कवर करण्यात आला. यावेळी राहुल गांधी बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्याजवळ येवून रडले. मी जेलमध्ये जाऊ शकत नाही असे विधान केले होते. यावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बोलतांना म्हणाले की, हे विधान जर माझ्या विषयी असेल तर ते हास्यास्पद आहे. तथ्यहिन आहे असे म्हणाले.
कॉंगे्रसचे नेते राहुल गांधी मुंबई येथील शिवाजी पार्कवर सभेत बोलत असतांना म्हणाले महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता माझ्या आईजवळ म्हणजे सोनिया गांधींकडे येवून रडू लागले की, मी या लोकांच्या विरुध्द लढू शकत नाही. मला लाज वाटत आहे, माझी या शक्तीविरोधात व लोकांविरोधा लढण्याची ताकद नाही. मला तुरूंगात जायचे नाही असे विधान राहुल गांधी यांनी मुंबई येथील जाहीर सभेत कोणत्याही नेत्याच नाव न घेता केल आहे. नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राज्यातील एक वरिष्ठ नेता असल्या कारणाने हा इशारा खा.अशोक चव्हाण यांच्याकडे जातो. यावेळी अशोक चव्हाण यांना नांदेड येथील पत्रकारांनी विचाले असता ते म्हणाले की, मी पक्ष सोडण्याच्या बाबतीत कधीही कोणालाही सांगितल नाही. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाच्या मुख्यालयात राहु काम केल. सोनिया गांधी यांनाा मी कधी भेटलो नाही आणि माझी भावनाही व्यक्त केली नाही. यामुळे राहुल गांधी यांनी जे काही विधान केल आहे ते माझ्या बाबतीत असेल तर ते नक्कीच हास्यस्पद आहे. हे विधान चुकीच आहे. मी कॉंगे्रस पक्ष सोडणार असल्याची माहिती कोणालाही नव्हती ही वस्तुस्थिती आहे असे स्पष्ट मत खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *