पोलीस निरिक्षक चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; अखेर न्यायालयाने दिला क्षिरसागरांना न्याय

 

लोहा,(प्रतिनिधी)-लोहाच्या शिवसेना तालुका प्रमुखाला मारहाण करणाऱ्या लोह्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरविरुध्द लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.वि.डाखोरे यांनी स्वत: तक्रार घेवून चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांनी थेट न्यायालयात तक्रार केली होती की, मी पोलीस निरिक्षक चिंचोळकर साहेब यांना 15 ते 20 दिवसापुर्वी अवैध मटका व्यवसाय, अवैध गुटखा विक्री, अवैध रेती वाहतुक बंद करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर महिंद्रा फायनान्सकडून घेतलेल्या दीड लाख रुपये कर्जापैकी 75 हजार रुपये भरले होते. तरी पण महिंद्रा फायनान्सने पैसे भरले नाही म्हणून आडगाव ता.लोहा येथील माझ्या घराला सिल लावले. त्यानंतर महिंद्रा फायनान्स सोबत तडजोड करून आम्ही 1 लाख 10 हजार रुपये भरले आणि महिंद्रा कंपनीच्या लोकांनी माझ्या घराला लावलेले सिल काढून दिले.हा सर्व घटनाक्रम 6 मार्च रोजीचा आहे. त्यानंतर पोलीस अंमलदार किरपणे यांच्यासोबत चंद्रकांत क्षीरसागर लोहा येथे गेले. तेथे त्यांना अर्वाच्च भाषेत (ते शब्द लिहुन आम्ही माणुसकी सोडू इच्छीत नाही) शिवीगाळ केली. बेल्टने आणि लाथाबुक्यांनी चिंचोळकर यांनी क्षीरसागरला मारहाण केली. आणि तेथेच बसू ठेवले.त्यावेळी तेथे असलेल्या होमगार्ड सांगितले की, हा जागेवरून उठला तर याला लाथ घाल आणि पाणी मागितले तर पाणी सुध्दा देवू नको. सायंकाळी क्षीरसागरच्या मित्रांनी सांगितल्यानंतर पोलीस निरिक्षक चिंचोळकर यांनी क्षीसागरची सुटका केली. तेथून लगेच चंद्रकांत क्षीरसागर लोहा न्यायालयात गेले आणि लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.वि.डाखोरे यांच्या समक्ष आपली कैफियत मांडली. आपल्या पाठीवर असलेले मारहाणीचे व्रण दाखवले पण ते न्यायालयाला दिसले नाहीत. तेंव्हा न्यायालयाने क्षिरसागरला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. न्यायालयासमक्ष दिलेल्या जबाबात चंद्रकांत क्षीरसागर यांनी सांगितल की, मी माझ्या वरच्या खिशात मोबाईल ठेवून तेथील शुटींग करत होतो हा राग धरून माझी शुटींग करतोस काय? असे म्हणून मारहाण केली. काही दिवसांपुर्वीच सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुध्दा गणवेशात काम करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची व्हिडीओ शुटींग करता येते असे सांगितले होते.

यानंतर चंद्रकांत क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेवून आपली कैफियत पत्रकारांसमोर मांडली. त्यावेळी पत्रकारांच्या मोबाईल व्हाटसऍपवर चिंचोळकरांनी संदेश पाठविले की, चंद्रकांत क्षीरसागर विरुध्द असे विविध गुन्हे प्रलंबित आहेत. ज्याबद्दल मी चंद्रकांत क्षीरसागर विरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला आहे. हद्दपारीचा प्रस्ताव पाठवितांना जी व्याख्या मुंबई पोलीस कायदा कलम 56 मध्ये सांगितली आहे. त्या व्याख्येत क्षीरसागर बसतात की, नाही हा पुन्हा तांत्रिक मुद्दा आहे. लोहा न्यायालयाने चंद्रकांत क्षीरसागरच्या अर्जावर डायरेक्शन दिले आहेत की, भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 506, 504 आणि 323 प्रमाणे गुन्हा दाखल करावा आदेश लोहा पोलीसांना दिले आहेत. लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास कोण करील हा ही एक मुद्दा या आदेशानंतर समोर आला आहे. मागे मा. आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी ओमकांत चिंचोळकरविरुध्द विधानसभेत हक्क भंग प्रस्ताव मांडला होता. पण त्या प्रस्तावाचा शेवट काय झाला ही माहिती मिळू शकली नाही.

ओमकांत चिंचोळकरने हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना कोरोना काळात मारहाण करून त्यांच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल केला होता. आज कन्हैया खंडेलवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणाबाबत हिंगोली न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांनी दिली. म्हणतातना सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं.

या बातमी सोबत लोहा न्यायालयाच्या आदेशाची पीडीएफ प्रत वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे.

pi चिंचोलकर यांचेवर गुन्हा नोंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *