आसना नदीच्या पुलावर अपघात, पिता पुत्र‌ जागीच ठार

अर्धापूर(प्रतिनिधि) – नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील आसना नदीवर असलेल्या पुलावर ट्रक दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात पिता पुत्राचा जागिच मृत्यू झाला आहे.हा अपघात शुक्रवारी (ता १५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.या अपघातात मृत्यू झालेले पितापुत्र हे भोगाव (ता अर्धापूर) येथील हे आहेत.

या अपघाता बाबत महामार्ग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अर्धापूर कडून नांदेड कडे‌ गोपीनाथ दाजीबा गाडे,(वय ४५) दाजीबा शंकरराव गाडे (व‌य ६६) हे आपल्या दुचाकीवरून (एमएच २२ए.जी.७८२२) जात असताना ही दुचाकी आसना नदीच्या पुलावर आली आसता लातूरहून नागपूरकडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या आयचरने (एम एच ४५ए् ई ८८११) धडक दिली. भीषण अपघातात गोपीनाथ गाडे हे जागीच ठार झाले तर दाजीबा गाडे हे पुलावरून खाली पडल्याने गंभीर जख्मी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस वसमत फाटा येथील जमादार व्यवहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन सदरील जखमींना नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येथे नेले असता या दोघांची वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी नांदेडच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *