विवाहितेचा खून करणाऱ्या नवरा व सासऱ्याला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन वेळा गर्भपात करून विवाहितेचा खून केल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील नवरा आणि सासरा अशा दोन आरोपींना लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देविदास भगवान कदम रा.रुंज ता.पुर्णा जि.परभणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 मार्च रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान कल्पना विनायक मुद्रुले (27) रा.दगडगाव ता.लोहा या विवाहितेचा खून तिचा नवरा विनायक पुंडलिकराव मुद्रूले (30), सासरा पुंडलिक लक्ष्मणराव मुद्रूलेे(55), सासु गोदाबाई पुंडलिक मुद्रूले (50) आणि भाया बालासाहेब पुंडलिकराव मुद्रुले (32) या चौघांनी केला. या तक्रारीमध्ये कल्पनाचा दोनवेळा गर्भपात झाला. बाळांतपण करण्यासाठी माहेरूहून 1 लाख रुपये आणण्याची मागणी पण झाली होती. या प्रकरणी सोनखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 498 (अ), 323 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 40/2024 दाखल केला.
या प्रकरणाचे तपासीक अंमलदार सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी मयत कल्पनाचा नवरा विनयक पुंडलिकराव मुद्रुले (30) आणि त्याचे वडील पुंडलिकराव लक्ष्मणराव मुद्रुले(55) या दोघांना अटक केली. लोहा न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *