पत्रकार गौतम राकाजी गळेगांवकर यांचे निधन

 

नांदेड – येथील झुंझार पत्रकार टाईम्स नाऊ या वृतवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कांबळे यांचे आज दि. 12 मार्च रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

पत्रकार गौतम कांबळे हे आज दि. 12 मार्च रोजी शहरातील असर्जन परिसरातील मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी 1 च्या दरम्यान क्रिकेट खेळतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने विष्णुपूरी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

गौतम गळेगावकर मितभाषी पत्रकार म्हणून ख्यातकिर्त होते. घटनास्थळी धाव घेऊन लाईव्ह पत्रकारिता करणे ही त्याची खासीयत होती. सर्वांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते. मागील वर्षी देखील त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता.

त्यावेळी त्यांनी मृत्यूवर मात केली होती. पण आज काळाने त्यांच्यावर झडप घातली.

कालकथित गौतम गळेगावकर यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार दि.13 मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या मुळगावी बिलोली तालुक्यातील गळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगीतले.

गौतम गळेगावकर यांच्या निधनाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, राज्याध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर भाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे, माजी सरचिटणीस चारुदत चौधरी, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष ॲड. प्रदिप नागापूरकर, जिल्हा संघाचे विद्यमान अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, राम तरटे यांच्यासह अनेक पत्रकारांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *