माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन

 

कुंडलवाडी ( प्रतिनिधी) बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे वृद्धापकाळाने दिनांक 7 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायत सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास केलेल्या व जिल्ह्याच्या राजकारणात निष्कलंक व चरित्र्य संपन्न असा लौकिक मिळवलेल्या माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचा कासराळी ग्रामपंचायत सरपंचपदा पासून बिलोली पंचायत समिती सभापती,जिल्हा माध्यवृत्ती बँक संचालक ते आमदार असा राजकीय प्रवास झाला होता. ते भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परीषद. सदस्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड यांचे वडील होत.त्यांची अंत्यवविधी ८ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मौजे कासराळी येथील अमृतधाम गो शाळा येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार राजेश पवार,माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार वसंतराव चव्हाण,माजी आमदार बेटमोगरेकर आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *