नांदेड(प्रतिनिधी)-लाखो रुपये परत घेवून फक्त व्याजच आले मुळ रक्कम शिल्लक आहे असे म्हणून एका व्यापाऱ्याला त्रास देणाऱ्या पाच जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
निलेश रमेश सुत्रावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जानेवारी 2022 ते 6 मार्च 2024 दरम्यान त्यांनी आपल्या कापड दुकानासाठी शिवाजीराव आवडे याच्याकडून 6 लाख 50 हजार रुपये 10 टक्के महिनेवारी व्याजावर घेतले. आजपर्यंत त्यांना 5 लाख 10 हजार रुपये परत केले आहेत. अजून पैसे देणे सुरूच आहे. लोहा येथील व्यंकट दांडगे याच्याकडून 60 हजार रुपये व्याजाने घेतले या व्याजाचा दर सुध्दा 10 टक्के आहे. व्यंकट दांडगेला आजपर्यंत 1 लाख 10 हजार रुपये परत दिले आहेत. उर्वरीत रक्कम देणे चालूच आहे. लोह्यातील संतोष निखाते याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये व्याजाने घेतले त्यात काही रक्कम परत केली आणि उर्वरीत रक्कम देणे बाकी आहे. संतोष निखातेला आजपर्यंत 1 लाख 45 हजार रुपये रक्कम परत केली. लोहा येथील करण साबळे याच्याकडून 1 लाख रक्कम 10 टक्के व्याजावर घेतली, लोहा येथील संतोष मोरे याच्याकडून 1 लाख रुपये घेतले आजपर्यंत 67 हजार रुपये परत केले आहेत. सन 2022 ते आजपर्यंत संतोष निखाते यांना फोन पे वर 1 लाख 40 हजार रुपये, करण साबळे 5 लाख 55 हजार रुपये दिले आहेत. व्यंकट दागटेला रोख 2 लाख रुपये दिले आहेत. संतोष मोरेला फोन पे वर 67 हजार रुपये दिले आहेत. शिवाजीराव आवडेला 5 लाख 10 हजार रुपये दिले आहेत. एवढी रक्कम परत करून सुध्दा आम्हाला आतापर्यंत फक्त व्याजच परत आले आहे. मुळ रक्कम बाकी आहे असे म्हणून संतोष निखाते, करण साबळे, व्यंकट दागटे आणि शिवाजीराव आवटे हे मला लोहामध्ये व्यवसाय करू देणार नाहीत आणि आमचे पैसे दिले नाही तर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत आहेत.
शिवाजी नगर पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 39 आणि 45 नुसार गुन्हा क्रमांक 82/2024 दाखल केला आहे. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक तांदळे यांच्या मार्गदर्शपात पोलीस उपनिरिक्षक राडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.