नांदेड(खास प्रतिनिधी)-हिंदी चॅनेल असलेले आणी नव्याने मराठी भाषेमध्ये येणाऱ्या चॅनेलचा मीच पत्रकार आहे . माझी नियुक्ती झाली आहे . असं रुकम्या डाकू आपल्या वसूली प्रतिनिधीना सांगत आहे . त्यामूळे देगलूर , नायगाव , माहुर , धर्माबाद येथील त्याचे हस्तक खुश झाले असुन इथून पुढे 19 एप्रिल नंतर मोठ्या चॅनलला लागणार असल्याचे आश्वासन पुढाऱ्यांना देउन रोजची सोय करत आहे . रुकम्या डाकूने देखील नविन येणाऱ्या मराठी चॅनेल साठी जोरदार फील्डिंग लावली आहे . रुकम्या सध्या वेगवेगळ्या माध्यम प्रतिनिधीच्या संपर्कात असुन नविन चॅनेल साठी शिफारस करण्याची भीक मागत आहे . पूर्वी चॅनलला असताना रुकम्याने ज्यांना आर्थिक रसद पुरवली , शिवाय नांदेड मध्ये ज्यांचे आदरातिथ्य केले ते काही जण रुकम्यासाठी प्रयत्न करत आहेत . शिवाय रूकम्याचा खास पुतण्याला देखील काका पुन्हा येणार अशी खात्री झाली आहे . रुकम्याला पुन्हा आणण्यासाठी नागपुरचे काका देखील आपले कसब वापरत आहेत . नागपुरच्या काकांनी अनेकांना संपर्क करुन रुकम्याची नविन येणाऱ्या चॅनेल साठी शिफारस केल्याची माहिती आहे . रुकम्या आला तर आपल्या पुत्राला मोठा आधार मिळेल यासाठी नागपुरच्या काकाची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे रुकम्याचा पुतण्या मोगली देखील माध्यम प्रतिनिधीना धमकीवजा इशारा देत आहे . सद्या मोगलीची पत्रकारीता हिंगोलीच्या जीवावर सूरु आहे . त्याला एका पत्रकाराने याबाबत विचारलं तेव्हा 19 एप्रिलची वाट पहा , वाघ येणार आहे अशा धमकीवजा इशारा देखील मोगलीने दिला.
मोगली कृष्ण लिलेत मग्न
1990 ते 95 च्या दशकात चड्डी पहेन के फूल खिला है हे गाणे खूप प्रसिद्ध होते . तीच अवस्था आज विदर्भातील मोगलीची झाली आहे. जंगलात राहण्याची मानसिकता असलेल्या या मोगलीला शहरातील वातावरण भावत असून तो डिजिटल मीडियातील महिला पत्रकारांसोबत ओळख वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. विदर्भाच्या जंगलात राहिलेल्या मोगलीला शहरातील सौंदर्य बघितल्यानंतर त्याची चलबिचल झाली असून नुकत्याच VIP रोडवर एका महिलांच्या तीन दिवसीय कार्यक्रमात डिजिटल मीडियात काम करणाऱ्या महिला पत्रकारांशी जवळीक साधत मला तुमच्या सोबत काम करायचं आहे , आपण दोघं सोबत काम करू ,सोबत फील्डवर फिरूया असं म्हणत तीन दिवस हा ‘माझा’च कार्यक्रम असल्यासारखं मोगली आणी रुकम्याचा हिंगोलीचा हस्तक वावरला.परंतु हे तीन दिवसाचे प्रकरण डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनिधींना खटकले. महिला पत्रकारांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही बाब कळवली. त्यानंतर ही बाब वरिष्ठापर्यंत गेली होती परंतु नागपूरच्या काकांचा आदर असल्याने त्यास तिथेच पूर्णविराम मिळाला.
म्हणूनच आज पुन्हा एकदा सआदत हसन मंटोची आठवण झाली,ते सांगून गेले आहेत की,तहजीब (सभ्यता), तमद्दुन (संस्कृती,शिष्टता) आणि समाजाची चोळी मी का उतरवू जे अगोदर पासूनच नागडे आहेत.मी त्यांना कपडे घालायचा प्रयत्न कधीच करत नाही. कारण हे काम शिंप्याचे आहे माझे नाही. मंटोंची आठवण करता करता त्यांचे कितीतरी शब्द आता आम्हाला तोंडपाठ झाले आहेत.ज्याचे पोट दुखले की किंवा काही चुकीचे केले की त्यासाठी आम्ही ‘रामबाण’ औषध घेऊन तयारच आहोत.