उपवासातील भगर खातांना दक्षता घ्या; प्रशासनाचे जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाशिवरात्री हा सण आहे. या निमित्त भाविकांमध्ये उपवास करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. उपवासाच्या वस्तु खाण्यामध्ये भगर हा एक प्रकार आहे. याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने एक प्रसिध्दी पत्रक काढून भगर या वस्तुचे सेवन करण्यासाठी सुचना दिल्या आहेत.या प्रसिध्दी पत्रकावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची स्वाक्षरी आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार भगर या उपवासाच्या वस्तुमध्ये अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे फ्युमिगाक्लेविन या सारखी विषद्रव्ये त्यात तयार होतात. ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशी प्रादुर्भाव असलेली भगर खाल्यामुळे अन्न विषबाधा होवू शकते.
यासाठी जनतेने बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावे. शक्यतो पॉकिट बंध भगर घ्यावा. ब्रॅंड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर बॉकिटे व सुटी भगर घेवू नये. भगर घेतांना पॉकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावा. भगरची साठवणूक करतांना ती स्वच्छ व कोरड्या ठिकाणी करावी. व्यवस्थेतील झाकन बंद डब्यात ठेवावे. जेणे करून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशी वाढणार नाही. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नये.
शक्यतो भगरीचे पिठ विकत आणू नका. कारण पिठामध्ये ओलावा शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पिठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पिठ साठवू नये. पिठ दळून बाहेरून आणण्याऐवजी घरीच दळा. भगर आणि शेंगदाने हे अधिक प्रतिनियुक्त पदार्थ आहेत. 2 ते 3 दिवस सलग उपवास असतांना या पदार्थांमुळे ऍसीडीटी वाढण्यास कारणीभुत होते. त्यामुहे उलटी, मळमळ, पोटांचे त्रास होता. या पदार्थांचे सेवन पचन शक्तीनुसार मर्यादीत ठेवावे.
भगर विक्रेत्यांना सुध्दा या प्रसिध्दी पत्रकात सुचना दिली आहे की, विक्रेत्यांनी पॅक बंद भगरच विक्री करावा. भगर खरेदी करतांना धाऊक विके्रत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकिट, पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करूनच घ्यावी. मुदत बाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटे भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेवू नये.
या सर्व सुचनांच्या तपासणीसाठी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार कार्यवाही सुध्दा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *